कऱ्हाड - नागरीकांच्या सोयीसाठी राज्य शासनाच्या निधीतुन तब्बल ११ कोटी रुपये खर्चुन येथे प्रशासकीय इमारत बांधली आहे. त्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर सेतु कार्यालयात दाखल्यासाठी जावे लागते. मात्र अंध, जेष्ठ नागरीक, जेष्ठ महिला यांना तिसऱ्या मजल्यावर चालत जाताना तोंडाल फेस येत आहे तर अपंग, दिव्यांगाना तेथे पोहचताच येत नाही. त्यामुळे त्यांना दिवसभर कार्यालयाखाली ताटकळुन रिकाम्या हातानेच घरी परतावे लागते. त्यांच्या गैरसोयीचा विचार करुन प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी हे कार्यालय तातडीने तळमजल्यावर आणण्याची गरज आहे.
(Video - हेमंत पवार)
#sakalmedia #karad